रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (16:29 IST)

बाळासाहेब यांच्या स्मारकासाठी वास्तूची कागदपत्रे सुपूर्द

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या वास्तूची कागदपत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक समितीचे प्रमुख तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केली. याआधी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 
 
मुंबईतील शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानाच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) या स्मारकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. स्मारक उभारणीसाठी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या संस्थेची नोंदणी यापूर्वीच करण्यात आली आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक या संस्थेला महापौर बंगल्याची जागा भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे.