रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जानेवारी 2019 (16:47 IST)

कारचे टायर फुटून अपघात, एकाच कुटूंबातील तिघे ठार

नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे  रेणुकामाता मंदिराजवळ टायर फुटल्याने कार बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात वणी येथील एकाच कुटूंबातील तिघे जागीच ठार झाले. यामध्ये वणी येथील सप्तशृंग पतसंस्थेचे संचालक संजय समदडीया, पत्नी वंदना समदडीया व मुलगा हिमांशु समदडीया अशी मृतांची नावे आहेत. धुळे येथे नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यास ते गेले होते. विवाहसोहळा आटोपून वणी येथे परतत  असतांना सदरचा अपघात झाला. फोर्ड फिगो या कारमधुन ते परतीचा प्रवास करत होते.