1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जानेवारी 2019 (11:50 IST)

व्हाट्सएप वापरकर्ते आता एका वेळी 5 लोकांनाच चॅट फॉरवर्ड करू शकतात

व्हाट्सएपने आता जागतिक पातळीवर फॉरवर्ड केले जाणार्‍या संदेशांना 1 वेळी 5 चॅटपर्यंत सीमित केले आहे. कंपनीने  भारतात गेल्या वर्षी जुलैमध्येच ते लागू केले आहे. व्हाट्सएपने या प्लॅटफॉर्मवर अफवा आणि खोट्या बातम्या टाळण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. व्हाट्सएपने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की हे कंपनीला वैयक्तिक संदेशांवर लक्ष देण्यास मदत मिळेल. 
 
कंपनीच्या मते आम्ही फारच सावधगिरी बाळगून ही तपासणीचे केली आणि सुमारे 6 महिन्यापर्यंत वापरकर्त्यांकडून मिळालेल्या प्रतिसादांवर लक्ष केंद्रित केले. संदेश फॉरवर्ड करण्याची मर्यादा सेट केल्याने जगभरात संदेश फॉरवर्ड करण्यावर नियंत्रण होईल. व्हाट्सएपनुसार संदेश आणि चॅट इत्यादींना फक्त पाच लोकांना फॉरवर्ड करता येईल. 
 
व्हाट्सएप इंडिया, ब्राझील आणि इंडोनेशियाला त्यांचा मुख्य बाजार मानतो. कंपनीच्या मते तो वापरकर्त्यांच्या प्रतिसादांवर सतत लक्ष देईल आणि कालांतराने व्हायरल सामग्रीच्या समस्येशी तडजोड करण्यासाठी नवीन पद्धतीचे वापर करेल. व्हाट्सएपनुसार त्याच्या तपासणी दरम्यान व्हाट्सएपवर शेअर केलेल्या संदेशांची संख्या 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. व्हाट्सएपमते जवळच्या मित्रांना संदेश देणे आणि कोणत्याही प्रकारचा गैरवापर टाळण्यासाठी हे पुरेसे आहे. कंपनीने अशा वेळी हे पाऊल उचलले आहे जेव्हा जगभरातील सरकार आणि नियामक डिजीटल मंच खोट्या संदेशांचा प्रसार थांबविण्यासाठी प्रभावी मार्ग शोधत आहे. 
 
महत्त्वाचे म्हणजे व्हाट्सएप पासून प्रसारित अफवांमुळे भारतात हिंसाच्या घटना घडत होत्या. त्यात बर्‍याच लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. यानंतर भारतात व्हाट्सएपला सरकारकडून तीव्र टीकेचा सामना देखील करावा लागला.  सरकारी दबावानंतर कंपनीने फॉरवर्ड केल्या जाणार्‍या संदेशांची सीमा 1 वेळी फक्त 5 लोकांना संदेश पाठवू शकता अशी केली. तसेच, जलद फॉरवर्ड बटण देखील काढून टाकण्यात आले.