1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (10:16 IST)

अबब, किती उंच राष्ट्रध्वज

long flag
मुंबईच्या डोंबिवलीमध्ये १५० फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. त्यावर २० फूट उंची आणि ३० फूट लांबीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे. उंचीच्या बाबतीत हा तिरंगा देशात तिसऱ्या तर महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानी असेल. विशेष म्हणजे डोंबिवलीतल्या एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीने या चंग बांधला असून त्यासाठी डोंबिवलीत २ एकर उद्यानाची जागा देखील निश्चित करण्यात आली आहे. भोपर- देसले पाड्यातील लोढा हेरिटेज को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या वतीने  ध्वज उभारला जात आहे. 
 
सध्या महाराष्ट्रात पुण्यात आणि देशात वाघा बॉर्डर येथे सर्वात उंच झेंडा उभारण्यात आला आहे. त्यानंतर आता डोंबिवलीत हा झेंडा फडकवला जाणार आहे. ‘येत्या २५ जानेवारीला दुपारी अडीच वाजता ८ गोरखा रायफल्सचे कर्नल आर. सी. देशपांडे यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचं अनावरण होणार आहे’, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष नासीर खान यांनी दिली आहे.