मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (10:03 IST)

सी व्हिजन अंतर्गत 36 तासांचा विशेष उपक्रम

मुंबईला टार्गेट करत 26/11 ला समुद्रमार्गे घुसले होते. या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या सागरी सुरक्षेवर भर देत सागरी सुरक्षा कवच हा उपक्रम सुरक्षा यंत्रणांकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली. भारतीय नौदल, सागरी तटरक्षक दल आणि स्थानिक पोलिसांकडून सागरी सिमेची सुरक्षा करण्यात येते. ही सुरक्षा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी संशयीत व्यक्ती, संशयीत बोटी पाठवून किंवा बोटी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी सी व्हिजन अंतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून 36 तासांचा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
 
महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सागरी सिमेवर यासाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी मुंबई पोलीस दलातील सागरी गस्ती घालणार्‍या पोलिसांसह गिरगाव चौपाटी, मरीन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, कुलाबा, शिवडी, दादर चौपाटी, माहीम, वांद्रे, वर्सोवा, जुहू, मढ-मार्वे या समुद्र किनार्‍यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांना तैनात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून बुधवारी रात्री आठ वाजेपर्यंत सागरी सिमेवर नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.