गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (09:34 IST)

पत्नीला आला विवाहबाह्य संबंधाचा संशय, कापले पतीचे गुप्तांग

wife suspected of having an extramarital affair
ओडिसामध्ये  नबरंगपूर जिल्ह्यातील उदयपूर येथे एका महिलेने विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या पतीचे गुप्तांग कापले आहे. या घटनेनंतर पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. पती रात्री झोपलेला असताना धारदार चाकूने पत्नीने त्याचे गुप्तांग कापले. त्यानंतर पीडित पतीने जोरदार आरडओरडा केल्याने शेजारील लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
 
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे.