शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 जानेवारी 2019 (09:48 IST)

बाप्परे, चक्क पोलीस चौकीच हडपली

लोणावळ्यात चक्क एक पोलीस चौकीच हडपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आय.एस. पाटील या पोलीस अधिकाऱ्याने हा प्रताप केला आहे. येथील वळवण भागात आय.एस. पाटील यांच्या पुढाकारने लोकसहभागातून पोलीस चौकी उभारण्यात आली होती. यासाठी नारायण धाम संस्थेने १५ लाखांची आर्थिक मदतही केली होती. 
 
 या पोलीस चौकीत सध्या हॉटेल चालवण्यात येत आहे. तसेच पोलीस चौकीच्या दर्शन भागात सुमन पाटील अशा नावाची पाटी दिसते. या सगळ्याची अधिक चौकशी केल्यानंतर आय.एस. पाटील यांनी रचलेला बनाव पुढे आला आहे. लोकसहभागातून पोलीस चौकी उभारताना आय.एस. पाटील यांनी जागेची मालकी आपली नातेवाईक सुमन पाटील हिच्या नावावर केली. विशेष म्हणजे ही जागा टपाल कार्यालयासाठी आरक्षित होती.