शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 जानेवारी 2019 (14:09 IST)

रेडमीचे तीन भन्नाट फोन लवकरच भारतात

शाओमीने अलीकडेच रेडमीला वेगळा ब्रँड म्हणून घोषित केले होते. आता कंपनीने या बॅनरखाली आपला पहिला स्मार्टफोन रेडमी नोट 7 लाँच केला आहे. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे. हा स्मार्टफोन या आधीच चीनमध्ये लाँच झाला आहे आणि लवकरच रेडमी नोट 7 जगभरात लाँच होणार आहे. माय स्मार्ट प्राइसच्या एका अहवालानुसार हा फोन लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.
 
अहवालानुसार, रेडमी नोट 7, रेडमी नोट 7 प्रो आणि रेडमी गो पहिल्या तिमाहीत भारतात लाँच होणार आहे. रेडमी नोट 7 प्रो हे रेडमी नोट 7 चे अद्यावत व्हर्जन असेल. या स्मार्टफोनमध्येही 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असण्याची शक्यता आहे. याशिवाय कंपनी एक बजेट स्मार्टफोन शाओमी रेडमी गो देखील सादर करणार आहे. कंपनीचा हा पहिलाच अँड्रॉइड गो स्मार्टफोन असणार आहे.
 
भारतात ही आहे किंमत
 
शाओमी रेडी नोट 7 स्टोरेजच्या आधारावर तीन प्रकारात लाँच केला होता. 3जीबी +32 जीबी, 4 जीबी +64 जीबी आणि 6 जीबी +64 जीबी अशा तीन प्रकारातील हे फोन 
 
आहेत. या तिन्ही फोनची किंमत अनुक्रमे 999 युआन म्हणजेच अंदाजे 10,000 रुपये, 1199 युआन म्हणजे अंदाजे 12,000 रुपये आणि 1399 युआन म्हणजेच जवळपास 
 
14,000 रुपये आहे. बातम्यांनुसार रेडमर नोट 7 प्रो पुढल्या महिन्यात 2 प्रकारात लाँच होण्याची शक्यता आहे. फोनची मूळ प्रकारात 4जीबी रॅआणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असण्याची शक्यता आहे.