गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जानेवारी 2019 (10:13 IST)

बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती : शिवाजीपार्क झाले भगवामय

shivaji park
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यानिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येत शिवसैनिक शिवाजी पार्क येथे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी जमणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर, भाजपाशी युतीच्या चर्चेचा निर्णय झाला नसताना मुंबईत शिवसेनेचे मोठे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदीत्य ठाकरे तसेच शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते आणि हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उपस्थित असतील. यामुळे सकाळपासूनच शिवाजीपार्क येथील वातावरण भगवामय झालेले दिसून येत आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अद्याप कागदोपत्रीच दिसत असल्याने शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला होता.  या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आजा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही स्मृतीस्थळाला अभिवादन करतील. अशावेळी शिवसेनेचे नेते काय भूमिका मांडतात ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 
 
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शिवाजी पार्क महापौरनिवास्थानी गणेशपूजन करण्यात येणार आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहीती समोर येत आहे. 'एमएमआरडीए'कडे याची संपूर्ण जबाबदारी देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय हा निर्णय झाला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेला खूश करण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.