मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली : प्रकाश आंबेडकर

Prakash Ambekar
‘शिवसेना-भाजपची युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली आहे’ अशी प्रतिक्रिया बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  दिली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना आंबेडकर म्हणाले, की ‘ज्यांच्या जागा जास्त मुख्यमंत्री त्याचाच असं यांचं सूत्र आहे. त्यामुळे आपला मुख्यमंत्री करण्यासाठी ‘त्यांचे’ पाडा असे धोरण राबवले जाणार आहे.‘ दरम्यान, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीच्या युतीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्याबाबत २३ फेब्रुवारीला बोलणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे ही युती होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात राहिलं आहे.