गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बस मध्ये बॉम्ब होता पथकाने केला निकामी

रायगड येथील कर्जत  ते आपटे  बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली,  बुधवारी दि.२० रात्री या सदृश वस्तूची चाचपाणी केली असता हा  ३ ते ३.५ केजीचा बॉम्ब असल्याचे अलिबाग बॉम्ब पथकाकडून स्पष्ट केले गेले.  कर्जत येथून आपट्याला येणारी बस आपटे बस डेपोमध्ये थांबली असताना वाहकला  पिशवीत  टाईम बॉम्ब सारखे दिसून आले होते.  त्यांनी लगेच स्थानिक पोलिसांना माहिती कळविली. पोलिसांनी ताबडतोब बॉम्ब शोधक पथकाला बोलावले होते. 
 
बुधवारी ता.२० मध्ये रात्री  रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रायगडचे पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्यासह अलिबाग वरून बॉम्ब शोधक पथक सोबत घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही गोष्ट वाऱ्या सारखी पसरली आणि सर्वांमध्ये भितीचे वातावरण पसरले, पोलिसांनी सर्वांना बस पासूनच दूर अंतरावर नेले. आलेल्या बॉम्ब शोधक पथकाने पाहणी केली असता ती वस्तू खरोखरच बॉम्ब  असल्याचे दिसून आले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरू झाले. शेवटी मध्‍यरात्री साडेतीनच्या सुमारास यशस्वीरीत्या बॉम्ब निकामी केला गेला आहे. ठाणे येथे देखील अश्याच छोट्या  बॉम्ब सदृश्य वस्तूचा स्फोट झाला होता.