मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 16 मार्च 2019 (09:12 IST)

निवडणूक आयोगाने दर ठरविले वडापाव १२ रु., पुरीभाजी २५ प्लेट गांधी टोपी १५ रु वाचा इतर दर

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या दिलेल्या खर्चासाठी जिल्हा दर सुचीमध्ये वडापाव १२ रुपये नग व पुरीभाजी २५ रुपये नग असे दर निश्चित केले असू,  दिलेल्या दरापेक्षा जास्त दर असेल तर चालणार आहे मात्र निर्धारित केलेल्या दरापेक्षा कमी दर मात्र मंजूर केले जाणार नाहीत, असे आयोगाकडून पूर्ण स्पष्ट केले. निवडणुकीत प्रचार करताना उमेदवाराला खर्चासाठी ७० लाख रूपयांची मर्यादा दिली आहे. तर कार्यकर्त्यांच्या जेवणासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चावरही मर्यादा यामुळे उमेदवाराला आणावी लागणार हे उघड झाले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशा नुसार उमेदवाराला त्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्या दिवसापासून तर मतदान पूर्ण होईपर्यंतचा दैनंदिन खर्च रोजच्या रोज निवडणूक आयोगाला पूर्ण सादर करावा लागत असतो. खर्चात उमेदवाराकडून अनेकदा बऱ्याच वस्तुंचे दर बाजारभावापेक्षा कमी दाखवत आयोगाच्या निर्धारित खर्चापेक्षा कमी खर्च दाखवला जातो. आत एकूण ७० लाख रुपये खर्चाच्या मर्यादेत सर्व खर्च आणि कार्यकर्ते सांभाळावे लागणार आहे. सोबतच आयोगाने प्रचार, कार्यकर्त्यांसाठी लागणाºया अनेक विविध वस्तुंचा अगदी सखोल  विचार केला असून दर सुचीच प्रसिद्ध केलीय. प्रचारसभेच्या खर्चातच एकूण ४२ प्रकारच्या खर्चाचा विचार आयोगाने केला आहे. प्रचाराचा मांडव हार श्रीफळ, पाण्याची बाटली तर खाण्याच्या भत्त्यापर्यंत सर्व गोष्टींचा आयोगाने यामध्ये समाविष्ट केलाय. मंडप, लाईट, साधे, एलईडी, पंखे, टेबल. सिलिंग, गादी, उशी, अशा नाना विविध गोष्टींचे नगनिहाय दर या सुचीत नमूद केले आहेत. आयोगाने आदेशीत केल्या नुसार वडापाव १२ रुपये, पुरीभाजी २५ रुपये, बिसलेरी बाटली १२ चा संच १२० रुपए, २० लिटरचा जार ३५ रुपये प्रचार सभेनंतर फेटे (प्रति नग १५० रुपये), गांधी टोपी (प्रति नग १५ रुपये), पुणेरीपगडी (प्रति नग ३५० रुपये) यांचा खर्च दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक आता उमेदवाराला अवघड होणार आहे. खर्च कसा लपवायचा असे उमेदवार मार्ग शोधतील मात्र निवडणूक आयोग त्यांच्यावर आता अंकुश ठेवणार आहे.