मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 मार्च 2019 (10:03 IST)

काय राज ठाकरे पाकिस्तानी नायक बनू इच्छित आहे: विनोद तावडे

भाजपच्या महाराष्ट्र इकाईचे नेते विनोद तावडे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्ला करत विचारले आहे की काय ते 26 फेब्रुवारीला भारतीय वायू सेनेद्वारे शेजार्‍याच्या देशात दहशतवादी शिबिरांवर केलेल्या एअर स्ट्राइकवर शंका घेऊन पाकिस्तानचे नायक बनू इच्छित आहे का?
 
राज्यातील शिक्षा मंत्री तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आलोचना करणार्‍या ठाकरेंवर हल्ला केला आहे. तावडे यांनी म्हटले की हवाई हल्ल्याच्या प्रभावावर शंका घेऊन काय राज ठाकरे तेथील हीरो बनू पाहत आहे.
 
उल्लेखनीय आहे की मनसे लोकसभा निवडणुका लढणार नाहीये परंतू मनसे प्रमुख राज ठाकरे भाजप सरकारविरुद्ध प्रचार करणार. राज ठाकरे यांनी म्हटले की त्यांना कधीही स्वत:हून काँग्रेस-राकांपा यांच्याकडे युती आणि जागांबद्दल चर्चा केलेली नाही.