मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2019 (13:32 IST)

गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबद्दल 5 खास गोष्टी

- प्रमोद सावंत व्यवसायाने एक शासकीय आयुर्वेद चिकित्सक होते. त्यांना मनोहर पर्रिकर यांनी राजकारणात आणले होते. ते पर्रिकर यांची पहिली पसंत असल्याचे मानले जाते.
- डॉ. सावंत यांचा जन्म 24 एप्रिल 1973 मध्ये झाला असून त्यांची पत्नी सुलक्षणा देखील भाजप नेत्री आहे.
- सावंत यांनी 2008 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढली होती. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2012 मध्ये ते पहिल्यांदा आमदार निवडून आले होते. 2017 मध्ये पुन्हा आमदार बनल्यावर ते विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते.
- पर्रिकर यांच्याप्रमाणेच सावंत देखील लहानपणापासून आरएसएस शी जुळलेले आहे. राजकारण रुची असल्यामुळे त्यांना भाजपमध्ये सामील करण्यात आले होते असे सांगितलं जातं.
- सावंत यांनी पक्षाप्रती निष्ठावान असल्याचा इनाम मिळाला आहे. ते कोणत्याही खाजगी महत्त्वाकांक्षा न ठेवता पक्षाची अधिक काळजी घेतात. पक्षादेखील पुढील 10-15 वर्षांपर्यंत पक्षाचे नेतृत्व करणार्‍या कमी वयाच्या नेत्याची गरज होती.