1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

माथेफिरुचा जैन मुनींवर जीवघेणा हल्ला, मुनी जखमी गुन्हा दाखला

jain muni attack
पुणे येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. अहिंसेचा संदेश देत जैन धर्माचा प्रसार, प्रचार व्हावा यासाठी जैन मुनी पायी प्रवास करतात. मात्र याच जैन मुनींना शिरुर तालुक्यातील कवठे गावात एका माथेफिरुने हल्ला करत जबर मारहाण केली आहे. या माथेफिरु तरुणाने लोखंडी गजाने जबर मारहाण केली आहे. या प्रकरणी शिरुर पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस माथेफिरुचा शोध घेत आहेत.
 
शिरूर येथून शिरूर-भिमाशंकर रोडवरुन मंचरकडे पाच जैन मुनी पायी निघाले होते. त्याचवेळी मुंजाळवाडी कवठे येमाई परिसरात एका माथेफिरू तरुणाने लोखंडी गजाने जैन मुनींना हल्ला केला आणि त्यान जबरी मारहाण केली. तर हा प्रकार पाहून त्याला थांबवायला गेलेल्या स्थानिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मध्यस्थी करणाऱ्यां तरुणांवरही या तरुणाने मारहाण केली आहे. मानवतेचा संदेश देत गावात एक वेगळी विचारधारा घेऊन जाणारे हे जैन मुनी कुणालाही अडथळा कधीही ठरत नाहीत. मात्र यांना झालेली मारहाण का, कशासाठी झाली. असा प्रश्न सध्या जैन मुनींनी उपस्थित केला आहे.सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माथेफिरू तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत. लवकरच त्याला अटक करू असे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.