शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

भाजपच्या या खासदाराला हृद्य विकाराचा धक्का, तिकीट कापतील या कारणामुळे

सध्या राज्यात लोकसभा वातवरण जोरदार असून, सत्तधारी भाजपा पुन्हा सत्तेत येण्यासाठी निवडून येणारे उमेदवार निवड आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील  भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना मात्र  हृदयविकाराचा धक्का बसला आहे.  राज्यत लोकसभा जोरदार तयारी असून, संजय धोत्रे यांचं तिकीट कापण्याच्या तणावातून त्यांना हा हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती उसोर आली  आहे. धोत्रे यांना रुग्णालयात दाखल केले आहे. 
 
मागील काही दिवसांपासून अकोल्यात तिकीटासाठी  जोरदार संघर्ष दिसून येतो आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी जवळपास अडीच लाख मतांची आघाडी घेतली होती, अकोल्यात सध्या भाजप नेते रणजीत पाटील व संजय धोत्रे असे दोन गट भाजपमध्ये दिसून येत आहेत.  त्यामुळे अनेक विकासकामं अंतर्गत संघर्षातून  रखडली. या सर्वांचा ठपका संजय धोत्रेंवर ठेवला जात आहे. त्यामुळे संजय धोत्रे यांचं तिकीट कापणार असल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. 
 
याच तणावातून त्यांना काल रात्रीच्या सुमारास हृदयविकाराचा झटका  बसला आहे. अकोल्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची एन्जीओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने जोरदार जन पाठींबा मिळवला आहे त्यामुळे देखील निवडणूक चुरशीची होईल असे चिन्ह आहेत.