शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आता शरद पवारांना तरी भाजपात घेऊ नका, गंमतच उरणार नाही

हल्ली कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. उद्या तो भाजप नाहीतर शिवसेनेत असायचा मात्र आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका ही विनंती उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. ते अमरावतीत शिवसेना- भाजप युतीच्या महामेळाव्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
 
या वेळी व्यंग करत उद्धव ठाकरे म्हणाले की आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते. की समोरचा दोघांमधून कोणत्या तरी पक्षाचा असायचा पण आता तेवढं शरद पवारांना भाजपात घेऊ नका नाहीतर निवडणुकीत गंमत उरणार नाही. थोडी तरी लोक समोरच्या बाजूला असावी नाहीतर बोलायचं तरी कोणावर जर सगळेच आपल्या पक्षात आले तर.
 
यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि ते भावासारखे असून अशी व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी असल्याचा अभिमान असल्याचे सांगितलं. वैर पेक्षा देशहित आधी असा संदेश देत झालं गेलं विसरून आता खर्‍या मैदानात उतरा असे आव्हान ठाकरे यांनी केले.
 
कारण काही दिवसांपूर्वी दोन्हीकडून एकमेकांवर टीका सुरू होत्या. मुख्यमंत्र्यांनी मनातून आणि म्यानातून तलवारी काढल्या आहेत असे ठाकरे यांनी म्हटले.