गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (18:09 IST)

भाजपची पहिली यादी हे आहेत उमेदवार

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी तयार असून, पहिल्या यादीत महाराष्ट्रातील 7 उमेदवारांची नावं आहेत. ही यादी लवकरच जाहीर होणार आहे. 
 
भाजपच्या 7 उमेदवारांची नावं :
 
नागपूर -नितीन गडकरी
चंद्रपूर – हंसराज अहीर
जालना – रावसाहेब दानवे
पुणे – गिरीश बापट (  लोकसभेच्या रिंगणातून माघार) 
अकोला – संजय धोत्रे
भिवंडी – कपिल पाटील
गडचिरोली – अशोक नेते
 
संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या पुणे लोकसभेच्या जागेवर भाजप कोणाला तिकीट देणार याकडे सर्वांच्या कुतूहल आहे. आगोदर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना पुणे लोकसभेतून भाजपकडून तिकीट मिळाल्याची माहिती समोर आली, मात्र, आता गिरीश बापट यांनी लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे पुण्यातून भाजपकडून कोण, हा प्रश्न पुन्हा उपस्थित राहिला आहे. यावेळी पुण्याची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.