1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (09:57 IST)

भाजपाला सत्तेसाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल

The BJP
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे वाटत नाही असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. भाजपा हा पक्ष लोकसभा निवडणुकांमध्ये मोठा पक्ष ठरेल. मात्र भाजपाला सत्ता मिळवण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावी लागेल असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर मोदी तुम्हाला राजकीय गुरु मानतात का? या प्रश्नावर शरद पवार म्हटले की मोदी कोणाचा सल्ला घेत नाहीत. ते कायम आपली 56 इंच छाती दाखवत असतात असंही पवार म्हटले आहेत.
 
नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर लहान उद्योजकांचं कंबरडं मोडलं आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या निर्णयाची किंमत भाजपाला मोजावी लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर भाजपाची ज्या राज्यांमध्ये 10 वर्षे सत्ता होती अशा ठिकाणीही भाजपाची सत्ता आता नाही. देशातली अशीच स्थिती निर्माण होईल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.