सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 4 मार्च 2019 (14:58 IST)

या भारतीय स्टार क्रिकेटरची बायको भाजपमध्ये सामील

टीम इंडियाच्या ऑलराउंडर रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा आज भारतीय जनता पक्षात सामील झाली. इंजीनियरिंगचा अभ्यास करणारी रिवाबा मुळात गुजरातच्या जुनागढ येथील केशोदची रहिवासी आहे आणि एप्रिल 2016 मध्ये तिने जडेजासोबत लग्न केलं. 
 
जडेजाच्या गृहनगर जामनगर येथे राज्य कृषीमंत्री आर.सी. फाल्डू यांच्या उपस्थितीत भगवा अंगवस्त्र धारण केल्यानंतर ती म्हणाली की पंतप्रधान मोदी यांची कार्यशैली आणि त्यांचे व्यक्तित्व हे तिच्यासाठी प्रेरणादयक आहे. ती म्हणाली की तिला लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उभे करण्याचा किंवा नाही हा निर्णय पक्ष घेईल. ती फक्त सामाजिक सेवेसाठी राजकारणात आली आहे. 
 
एका प्रश्नाच्या उत्तरात रिवाबा म्हणाली की तिच्या या निर्णयाला तिच्या पतीचा पूर्ण समर्थन आणि परवानगी आहे. महत्त्वाचे आहे की मोदी सोमवारी जामनगर दौर्‍यावर येणार आहे. गेल्या वर्षी 19 ऑक्टोबर रोजी तिने पद्मावत सिनेमाच्या हिंसक निषेधामुळे चर्चेत आलेल्या जात-आधारित संघटना रजपूत करणी सेनाच्या गुजरात महिला युनिटचे अध्यक्षपद सांभाळले. 
 
जडेजाचा कुटुंब राजकोटमध्येही राहतो, जेथे क्रिकेटच्या थीमवर आधारित त्यांचे रेस्टॉरंट 'जड्डूस' आहे. जडेजाची मोठी बहीण नैना जडेजाने 5 फेब्रुवारीला नवनिर्मित राष्ट्रीय महिला पक्षात सामील झाली. गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील तीन राज्यांचे प्रभारी म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली आहे.