रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (17:48 IST)

राहुल गांधी यांची सभा आता एमएमआरडीए मैदानावर

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची १ मार्चला मुंबईत सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून काँग्रेसने अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे राहुल गांधी यांची ही सभा आता एमएमआरडीए मैदानावर सभा होणार आहे.
 
शिवसेना, मनसे, भाजप, वंचित बहुजन आघाडीला सभा घेण्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळते पण राहुल गांधीच्या सभेला सरकार जाणीवपूर्वक परवानगी देत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला. लोकशाही व्यवस्थेत सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे असे काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.