मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (10:05 IST)

हुश्य, युती झाली, जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर

शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची घोषणा केली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. युतीच्या अंतिम चर्चेसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा मातोश्रीवर आले होते. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. शिवसेन-भाजपाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा फॉर्म्युलादेखील जाहीर करण्यात आला. लोकसभेच्या 48 पैकी 25 जागा भाजपा लढवणार आहे. तर शिवसेना 23जागा लढवेल. तर विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवतील.
 
उद्धव ठाकरे यांच्या भेटीआधी सोफिटेल हॉटेलमध्ये अमित शहांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांच्यासह चर्चा केली. त्यानंतर ही नेते मंडळी युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर पोहोचली. याआधी उद्धव यांनी मातोश्रीवर शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला संजय राऊत, चंद्रकांत खैरे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.