बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (16:39 IST)

युतीचा तिढा सुटणार लढणार जवळपास सारख्या जागा, भाजपची निर्णयक भूमिका

शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचं सूत्र ठरत असल्याचा समोर येते आहे. यानुसार लोकसभा निवडणुकीत भाजपा 25, तर शिवसेना23 जागा लढवणार आहे. तर विधानसभा निवडणुकीत भाजपा 145, तर शिवसेना 143 जागा लढवणार असल्याचे समोर येते आहे. लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाच मोठा भाऊ असणार आहे. युतीचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाचे तीन दिग्गज नेते लवकरच मातोश्रीवर बोलणी करणार आहेत. यामध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी हे तीन बडे युतीची बोलणी  करणार आहेत. विधानसभेसाठी शिवसेना पुणे, नाशिक पट्ट्यातील जागांसाठी आग्रही आहे. या भागातील एकही जागा शिवसेनेकडे नाही. तर विदर्भाबद्दल शिवसेना फारशी उत्सुक नाही. विशेष म्हणजे भाजपाकडे असलेल्या अनेक जागा शिवसेनेला हव्या असल्याची माहिती मिळते आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांनाही सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे असणार आहे. संजय राऊत सामनामधून थेट मोदी सरकारला वारंवार लक्ष्य करत असतात. याशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलतानाही ते भाजपाविरोधात तीव्र भूमिका घेतात. त्यामुळे आता लवकरच युतीचा तिढा सुटणार असे चित्र असून दोघेही सोबत निवडणुका लढणार आहे.