मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 फेब्रुवारी 2019 (17:21 IST)

पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत

भाजप-शिवसेनेचे यांच्या युतीवर अधिकृत शिक्कामोर्तब होत असून संध्याकाळी मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन्ह पक्ष किती जागा लढवणार याबाबतचा अंतिम निर्णय या बैठकीत होणार आहे. तसेच राज्याचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाल्यानंतर दोन्ही पक्षांकडून संयुक्त पत्रकार परिषद होईल, असेही खासदार राऊत म्हणाले आहेत.