रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 मार्च 2019 (09:13 IST)

गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील साथ साथ

अहमदनगरहून भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुजय विखे पाटील हे एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईकडे रवाना झाले. कोणत्या कारणासाठी दोघेजण एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास केला. मात्र यामागचे कारण स्पष्ट झालेलं नाही.
 
सुजय विखे पाटील हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र आहेत. सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र ही जागा आघाडीच्या परंपरेनुसार राष्ट्रवादीच्यावाट्याला येते आणि राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी इतर पक्षांतून तिकिटासाठी चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे.