Last Modified रविवार, 10 मार्च 2019 (00:10 IST)
तोंडात नेहमी फ्रेश हर्ब चघळा. यामुळे तुमच्या श्वासाला दुर्गंधी येणार नाही.
तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी ग्रीन टी अथवा ब्लॅक टी घ्या. यात तोंडाच्या दुर्गंधीसाठी कारणीभूत असलेले बॅक्टेरियांना मारणारे पॉलीफेनॉल असतात.
झिंक असलेल्या माऊथवॉशचा वापर करा.
नेहमी दात घासताना जीभ स्वच्छ करा.
भरपूर पाणी प्या. द्रवयुक्त पदार्थ घ्या.
पोटाची उष्णता वाढविणारे पदार्थ कमी खा.
स्नॅक म्हणून इतर काही खाण्यापेक्षा सफरचंद, गाजर, जिकामा खा.
तोंडाचे आरोग्य चांगले राहील यास अधिक प्राधान्य द्या. नियमितपणे तोंडाची सफाई करा.