गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 मार्च 2019 (18:02 IST)

दुसऱ्यांची मुल मी धुणीभांड्यासाठी वापरुन घेत नाही : उद्धव ठाकरे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. याविषयी बोलताना… ‘त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला आणि सुजयला दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? अशी खोचक टीका पवारांनी केली होती. 
 
याच मुद्द्यावरुन ‘मी माझ्यासोबत इतरांच्या मुलांचेही लाड करतो. इतरांची मुलं मी धुणी भांडी करायला ठेवत नाही,’ अशा शब्दांत उद्धव यांनी आज पवारांना टोला हाणला. भाजपमध्ये दाखल झालेल्या सुजय विखे पाटील यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला.आदित्य ठाकरे यांच्यावर माझं कोणतंही बंधन नाही, निवडणूक लढवायची की नाही तो ठरवेल. पण यंदा तरी तो निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.