1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 9 मार्च 2019 (17:29 IST)

मनसे प्रमुख राज ठाकरे करणार त्यांची भूमिका स्पष्ट

MNS
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 13 वा वर्धापन दिन असून,  या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शुभेच्छा दिल्या. सोबतच आज राज ठाकरे त्यांच्या  कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. राज ठाकरे आजच्या भाषणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांबाबत भाष्य करणार हे निश्चित मानले जात्ते आहे. तर  मनसैनिकांकडून सोशल मीडियावर काही दिवासांपासूनच राज ठाकरेंच्या भाषणाबाबतच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

राज ठाकरे वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात  कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. राज ठाकरे मनसेच्या वर्धापन दिनी राजकीय सर्जिकल स्ट्राईक करतील. राज ठाकरेंचं कोल्हापुरातील भाषण एक टीझर होता, खरा पिक्चर 9 मार्चला पाहायला मिळेल असं मनसैनिकांच्या पोस्टवर लिहिले आहे.  त्यामुळे राज ठाकरे आज काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. लोकसभा लढवणार का ? की शरद पवार यांच्या सोबत महाआघाडी मध्ये सामील होणार, पक्ष कार्यकर्ते नेमके काय संदेश देणार हे आज संध्याकाळी कळणार आहे.