सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 11 मार्च 2019 (10:33 IST)

राज ठाकरे ९ मार्चला लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार

येत्या ९ मार्च रोजी मुंबईत मनसेचा १३ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे हे पक्षाची लोकसभा निवडणुकीविषयी असलेली भूमिका मांडणार आहेत. त्याच दिवशी ठाण्यातून ही निवडणूक कोणता उमेदवार लढणार हेदेखील स्पष्ट होणार आहे. परंतु, सध्या या निवडणुकीसाठी मनसे नेते अभिजीत पानसे, ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव, मनविसे जिल्हाअध्यक्ष संदीप पाचंगे व नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे या चार जणांची नावे चर्चेत आहे. 
 
यापूर्वी राज यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत मनसे स्वतंत्र निवडणूक लढविणार? आघाडीसोबत जाणार की ती लढविणारच नाही? याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट न झाल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.