राज ठाकरे तुम्ही सोबत या अजित पवार यांची ऑफर
निवडणुका जवळ येत असून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. मतांचे विभाजन होवू नये म्हणून सर्वच पक्ष उमेदवार प्रयत्न करत आहेत. त्यातच आता मतांचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आमच्यासोबत यावं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. मनसेला राष्ट्रवादीने सोबत येण्याची ऑफरच दिली आहे असंच या वक्तव्यावरून दिसतं आहे. अजून राज ठाकरे यांची यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सोबतच राजू शेट्टींचे मतभेदही दूर करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.एका खासगी मराठ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. काही दिवसांपासून राज ठाकरे हे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत भेटी घेताना दिसत आहेत. छगन भुजबळ यांनीही कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे मनसे राष्ट्रवादी एकत्र येणार का? या चर्चां रंगली आहे. अजित पवारांनीच मनसेला सोबत येण्यासाठी हात पुढे केला आहे. भाजपा विरोधात लढायचं असेल तर सेक्युलर विचार मानणाऱ्या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे. तसेच मनसे सोबत आल्यास मतांचं विभाजन टळेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे जर सोबत गेले तर मोठे राजकीय गणित बदलणार आहे.