मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (09:59 IST)

५० वर्षीय इसमाची धारदार शास्त्राने हत्या यवतमाळ शहरालगतच्या तळेगांव शिवारातील घटना

यवतमाळ शहरातील पांढरकवडा मार्गावरील गिलानी यांच्या शेतात एका ५० वर्षीय इसमाची धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना आज दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सुधाकर आनंदराव आत्राम रा. तळेगाव असे मृतकाचे नाव असून तो गिलानी यांच्या शेतात गेल्या चार वर्ष्यापासून राखवालीचे काम करीत होता. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी अधिकारी पियुष जगताप, ग्रामीण पोलीस ठाण्यातील एपीआय पाचकवडे, टोळी विरोधी पथकाचे प्रमुख संतोष मनवर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जुन्या वादाच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा संशय पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.