1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (09:22 IST)

प्रियंकाला देशासाठी अर्पण करतो, पती रॉबर्ट वाड्रांच्या भावुक पोस्ट

The passionate post
लखनऊमध्ये प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो सुरू आहे. याचदरम्यान प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी फेसबुकवर एक भावुक पोस्ट लिहिली आहे. रॉबर्ट वाड्रांच्या या भावुक पोस्टमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. उत्तर प्रदेशात गलितगात्र अवस्थेत असलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची कामगिरी त्यांना पार पाडावी लागणार आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी प्रियंका यांच्या खांद्यावर आहे. समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीच्या महाआघाडीचा आणि सत्ताधारी भाजपाचा मुकाबला करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.
 
वड्रा आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘आपल्याला उत्तर प्रदेशात काम करण्यासाठी आणि भारतीय जनतेच्या सेवेच्या नव्या प्रवासासाठी माझ्याकडून शुभेच्छा. आपण माझी सर्वात चांगली मैत्रीण आहात, एक आदर्श पत्नी आहात आपल्या मुलांसाठी एक चांगली आई आहात. तिकडे खुपच संवेदनशील आणि भ्रष्ट राजकीय वातावरण आहे. मात्र, मला माहिती आहे, लोकांची सेवा करणे तुमचे कर्तव्य आहे, त्यामुळे मी त्यांना भारताच्या लोकांकडे सोपवत आहे. कृपया त्यांना सुरक्षित ठेवा’, अशा स्वरुपाची भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.