गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (09:26 IST)

महिलेचा ९ वर्षीय मुलावर बलात्कार

केरळमध्ये एक धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची घटना समोर आली असून, महिलेवर ९ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी त्या विकृत महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तर केरळमधील थेहनीप्पलममध्ये ही घटना घडली असून, पीडित मुलाने झाल्या प्रकाराची माहिती डॉक्टरांना दिली असून त्या नंतर महिलेचा विकृतपणा समोर आला आहे. डॉक्टरांनी घटनेतील गांभीर्य ओळखून बाल हक्कासांठी लढणाऱ्या संबंधित संघटनांना माहिती दिली होती. या गंभीर प्रकणात पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला असून, थोडे थोडके नाही तर मागील वर्षभरापासून त्या विकृत महिलेकडून त्या पीडित मुलावर अत्याचार सुरू होते.
 
महिलेने केलेल्या लैंगिक छळामुळे त्या पीडित मुलाच्या मानसिकतेवर विपरित परिणाम झालाय. बालहक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेने ही माहिती दिली आहे. पोलिसांनी त्या महिलेविरोधात पॉस्को कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपी महिला पीडित मुलाची नातेवाईक असून, ती त्याच्या घराजवळच रहाते. गेल्या आठवड्यात पीडित मुलगा त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना आपल्या त्रासाबाबत सांगत होता तेव्हा हा सर्व प्रकार उघड झाला आहे. डॉक्टरांनी ही माहिती बालहक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेला दिली. त्यांनी मुलाचा जबाब नोंदवून घेतला. त्यांनतर याची तक्रार पोलिसांकडे केली. पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.