मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (08:50 IST)

15 दिवसांनंतर केरळमध्ये शाळा सुरु

केरळमध्ये शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था सुमारे 15 दिवसांनंतर सुरु झाल्या आहेत. पुराचे पाणी ओसरल्यानंतर शैक्षणिक संस्थांच्या इमारतीत साचलेली दलदल आणि केरकचरा हटवून त्या स्वच्छ करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. पुरामुळे नष्ट झालेली पुस्तके आणि विद्यार्थ्यांचे गणवेश राज्य सरकार विद्यार्थ्यांना पुरवणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली  आहे. अनेक शाळांत अजूनही पुराने बेघर झालेले 1 लाख 97 हजार नागरिक राहत आहेत. त्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवण्याचे प्रयत्न लष्करी पातळीवर सुरु आहेत. येत्या 3 सप्टेंबरला राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेस सुरु होतील असा विश्वास केरळचे शिक्षणमंत्री प्रा.सी रवींद्रनाथ यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे महापुराचा प्रचंड फटका बसलेला कोची विमानतळ पुन्हा पूर्णपणे सुरु करण्यात आला. या विमानतळावरून 30 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानोड्डाने पार पडली. 30 विमानाचे लँडिंगही कोचीत झाले.