शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 ऑगस्ट 2018 (17:22 IST)

अबकी बार तुम्हीच ठरवा यार !- राष्ट्रवादीचे कार्टून आंदोलन

इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होताना दिसत आहेत. याच मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सरकारवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने औरंगाबाद येथील क्रांतीचौकात कार्टून आंदोलन केले. क्रांती चौक येथील पेट्रोल पंपावर 'अबकी बार तुम्हीच ठरवा यार!', 'भाजपच्या आश्‍वासनांचे बुडबुडे' अशा मथळ्याच्या कार्टून्सचा समावेश असलेली पत्रके कार्यकर्त्यांतर्फे यावेळी वाटण्यात आली. या आंदोलनाने वाहनधारकांचे लक्ष वेधून घेतले.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष काशिनाथ कोकाटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभिषेक देशमुख, दत्ता भांगे, अमोल दांडगे तसेच महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.