सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

किराणा दुकानातून या 7 वस्तू MRP वर मुळीच खरेदी करू नका

कमी किमतीत उच्च दर्जाचे सामान खरेदी करणे कुणाला आवडणार नाही. परंतू किराणा खरेदी करताना त्यावर लिहिलेली किंमत देऊन सामान खरेदी केलं जातं. तर आता योग्य वेळ बघून वस्तू खरेदी केल्यास तर कमी किमतीवर ब्रँडेड वस्तू खरेदी करता येईल. ज्यासाठी एमआरपीहून कमी किंमत चुकवावी लागेल. तर इतर सामान आपण किराणा दुकानातून घेत असला तर हरकत नाही परंतू काही वस्तू सुपर मार्केटहून घ्यावा ते ही सुपर बचत ऑफरमध्ये. जाणून घ्या अश्या सामानाची यादी
 
1. सॉफ्ट ड्रिंक 
सुपर मार्केटमध्ये सॉफ्ट ड्रिंकच्या मोठ्या बाटल्या डिस्काउंटेड रेटवर उपलब्ध असतात. अनेकदा एकावर एक फ्री असे ऑफर असतात. अनेकदा सॉफ्ट ड्रिंकची एक्सपायरी संपण्यापूर्वी असे ऑफर येतात तर आपल्याला योग्य गणित लावून खरेदी करणे 
 
स्वस्त पडेल.
 
2. ब्रेकफास्ट फूड
सकाळच्या न्याहारी सेवन केल्या जाणार्‍या वस्तू जसे कॉर्न फ्लेक्स, मूसली इत्यादीवर 30 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळून जातं. स्कूल रिओपनिंग दरम्यान अश्या वस्तूंवर ऑफर असतात. तेव्हा खरेदी ठेवणे योग्य ठरेल.
 
3. चॉकलेट
अलीकडे मिठाईऐवजी चॉकलेटचे क्रेझ वाढले आहे. अशात फेस्टिव्हल सीझनमध्ये चॉकलेट्स पॅकेट्स एमआरपीहून कमी किमतीत मिळून जातात. अधिक पॅकेट्स खरेदी केल्यावर अधिक डिस्काउंट देखील मिळतं.  
 
4. कॉफी
सीझनप्रमाणे कॉफीच्या मोठ्या पॅकेट्सवर डिस्काउंट मिळतं, अशात आपण अधिक प्रमाणात कॉफी खरेदी करून ठेवू शकतात.
 
5. सॉस
लहान दुकानांमध्ये सॉस खरेदी करण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागते परंतू सुपर मार्केटमध्ये योग्य किमतीत केचप उपलब्ध असतं. अनेकदा आपल्याकडे बॉटल असल्यास रिफिल पाऊचदेखील उपलब्ध असतात.
 
6. आइसक्रीम
कोन किंवा कप मध्ये आइसक्रीम घेण्यापेक्षा ब्रिक कधीही स्वस्त पडते. अनेकदा ब्रिक किंवा कंटेनरवर ऑफर असतात.
 
7. फ्रूट जेम
फ्रूट जेमचे लहान डबे महागात पडतात त्याऐवजी मोठे डबे डिस्काउंटेड रेटवर उपलब्ध असतात. हे डबे एमआरपीहून कमी किमतीवर खरेदी करता येऊ शकतात.  
 
या व्यतिरिक्त अनेक अश्या वस्तू आहेत ज्या एमआरपीहून कमी किमतीत खरेदी करणे कधीही योग्य ठरेल. केवळ योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खरेदी करण्यासाठी लक्ष असू द्यावे.