महिन्याच्या त्या दिवसांचा राग म्हणजेच पीएमएस समस्या, जाणून घ्या काय आहे हे
पीएमएस अर्थात प्री मेंस्ट्रुएशन सिंड्रोम : महिलांमध्ये आढळणारा आजार
समजून घ्या त्या खास दिवसांची अवस्था
पीएमएस अर्थात प्री मेंस्ट्रुएशन सिंड्रोम. ही समस्या लाखो महिलांना परेशान करते. ही समस्या सामान्य असली म्हणून याला आजार असल्याचे नाकारलं जातं. ही एक शारीरिक-मानसिक स्थिती आहे जी महिलांमध्ये मासिक धर्माच्या आठ ते दहा दिवसाआधी होते आणि विभिन्न महिलांमध्ये याचे भिन्न लक्षणं दिसून येतात.
ज्या महिलांना डिलेव्हरी, मिस कॅरेज किंवा ऍबोर्शन यावेळी अधिक हार्मोनल बदल जाणवतं त्यांना पीएमएस होतं. गर्भ निरोधक गोळ्यांचे सेवन थांबवल्यावर देखील हे लक्षण दिसू लागतात. हार्मोनल स्तर नॉर्मल होयपर्यंत हे जाणवतं. साधारणात 20 वर्षाच्या वयानंतर याची सुरुवात होते.
या दिवसात महिला जास्त चिढू लागतात ज्यामुळे त्यांच्या वैयक्तिक जीवनात तसेच करिअरवर देखील प्रभाव पडतो. पीएमएसचे मूळ कारण अजून माहीत पडलेले नाही. हार्मोनल असंतुलनामुळे हे होत असलं तरी संतुलनासाठी योग्य पर्याय अजून सापडलेला नाही.
प्रत्येक महिन्यात पीएमएस चे संकेत मेंस्ट्रुअल सायकल च्या दिवसात मिळतात. शरीर फुगणे, पाणी एकत्र होणे, ब्रेस्टमध्ये सूज, एक्ने, वजन वाढणे, डोकेदुखी, पाठ दुखी, सांधे दुखी आणि स्नायू वेदना यात सामील आहे. या व्यतिरिक्त मूडी बदलणे, काळजी, डिप्रेशन, चिडचिड, गोड आणि खारट खाण्याची इच्छा, झोप न येणे, जीव घाबरणे इतर.
अनेक महिलांचे रडणे, परेशान होणे, आत्महत्या करण्याचे विचार येणे आणि भांडणे असे लक्षणं ही असू शकतात. हे लक्षणं तीव्र असल्यास डॉक्टरांना दाखवावे.
काय आपल्याला खरंच पीएमएस आहे- हे जाणून घेण्यासाठी आपल्या जवळ एक डायरी ठेवा ज्यात दोन तीन महिन्यापर्यंत होणारे लक्षणं नोट करून घ्या. ह्या डायरीने आपल्याला कळेल की आपले लक्षणं मासिक धर्माशी जुळलेलं आहेत की नाही.