मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

सर्दी- खोकला बरं न होण्याचे कारण

खूप दिवस निघून गेले तरी सर्दी- खोकल्यात आराम नसल्याचे काही कारण असतात. जाणून घ्या ते कारणं:
ता- आपण ताण घेत असाल तर आपल्या शरीरात हायड्रोकॉर्टिझोन हार्मोन स्राव होत असतो. याने रोगप्रतिकार प्रणाली कमजोर होतं ज्यामुळे सर्दी लवकर बरी होत नाही.
 
धूम्रपान- आपण धूम्रपान करत असाल तर सर्दी लवकर जात नाही. याने सतत कफचा निर्माण होत असतो.
 
स्प्रे- आपण सर्दीचे औषध स्प्रेद्वारे घेत असाल तर यामुळेही नाकात सूज येते आणि सर्दी बरी होत नाही.

व्यायाम- आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक आहे परंतू सर्दी असताना अधिक व्यायाम केल्याने इम्यून सिस्टमवर प्रभाव पडतो.
 
ऍलर्जी- जर आपल्याला माती, जनावरांचे फर, सुगंध, फूल व इतर अश्या काही वस्तूंने ऍलर्जी असल्या ते पोकळी निर्माण करतात आणि सर्दी टिकून राहते.
 
सायनुसायटिस- जर आपण नाकात संक्रमण आणि सुजेमुळे सायनुसायटिसने पीडित असाल तर सर्दीच्या औषधांचा प्रभाव होत नसतो.
 
न्यूमोनिया- जर आपण न्यूमोनियाने आजारी असाल तर नाक संक्रमण प्रती अधिक संवेदनशील होऊन जाते आणि सर्दी लवकर बरी होत नाही.