शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑगस्ट 2018 (08:39 IST)

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 5 दिवस बँका बंद ?

येत्या 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर आणि त्यानंतर 8 आणि 9 सप्टेंबरला बँका बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकिंग संबंधीत काही कामं असतील तर ती येत्या दोन दिवसांत करून टाका असेही सांगण्यात येत आहे. कारण 1 सप्टेंबरला अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असते त्यामुळे यादिवशी त्या-त्या राज्यात बँकिंग व्यवहार होणार नाहीत. त्यानंतर 2 सप्टेंबरला रविवारची सार्वजनिक सुट्टी आहे. 3 सप्टेंबरला जन्माष्टमी आल्याने या दिवशी देखील बँका बंद राहतील. तसेच पेन्शनबाबतच्या मागणीसाठी बँकिंग कर्मचारी 4 आणि 5 सप्टेंबरला संपावर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रातील कामं होणार नाही. याचा फटका एटीएमला बसू शकतो. कारण बँका बंद असल्याने अनेक एटीएममध्ये नो कॅशचा बोर्ड झळकू शकतो. दरम्यान, 6 आणि 7 सप्टेंबरला बँकिंग कर्मचारी कामावर परत येतील. त्यानंतर 8 सप्टेंबरला दुसरा शनिवार आणि 9 सप्टेंबरला रविवार असल्याने असून पहिल्या नऊ दिवसात फक्त 2 दिवस बँकिंग व्यवहार सुरू राहतील अशी शक्यता आहे.