मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019 (10:06 IST)

मिसेस सीएम बसल्या या गाडीत झाली इच्छा पूर्ण

सर्वांची लहनपणीची एक इच्छा असते आणि ती पूर्ण व्हावी असे देखील वाटते, असाच काहीसे झाले आहे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्या सोबत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची बैलगाडीत बसण्याची हौस पूर्ण झाली आहे. त्या म्हणाल्या की लहान पणापासूनची इच्छा आज पूर्ण झाली आहे. यावेळी त्यांनी बैलगाडीत बसून थोडावेळ बैलगाडी हाकली देखील होती. पिंपरी-चिंचवड मधील इंद्रायणी थडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती होती. भोसरी परिसरात आयोजित इंद्रायणी थडीत अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या, तेव्हा मुख्य कार्यक्रमाच्या अंतरापासून त्यांना बैलगाडीत बसवून घेऊन जाण्यात आले होते. यावेळी त्यांनी काही क्षण बैलगाडी देखील चालवली. भाषणात अमृता फडणवीस यांनी त्या क्षणांचा आवर्जून उल्लेख केला की बैलगाडीतून प्रवास हा लहानपणापासूनची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली असून पुढील वेळेस बैलगाडीत बसून शेतात जायलाही आवडेल असंही त्या म्हटल्या आहेत.