अरे बापरे महिलेच्या पोटातून काढला तीस किलोचा ट्युमर
मुंबई येथे उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद येथून आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेच्या पोटातून ३० किलोचा ट्यूमर काढण्यात जे.जे. रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या यूनिटला यश आलं असून, गेल्या ६ महिन्यांपासून तमन्ना (बदललेले नाव) यांना प्रचंड त्रास होत होता. मुरादाबाद इथल्या स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेऊनही त्यांना काहीच बरं वाटत नव्हतं. त्यानंतर त्या मुंबईतील सरकारी रुग्णालयांपैकी जे.जे. या प्रमुख रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. या महिलेला श्वास घ्यायला त्रास होत होता. तर हृदयाच्या झडपा, यकृत, पित्ताशय आणि गर्भाशय या शरीरातील सर्व अवयवांमध्ये हा ट्यूमर पसरला होता असे तपासणीत समोर आले होते. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली आहे. तमन्ना यांचं पोट एखादा मोठा फुगा फुगवावा, एवढं फुगलं होतं.काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी महिलेवर शस्त्रक्रिया केली गेली. आता या महिलेची प्रकृती स्थिर आहे असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती देताना जे.जे. हॉस्पिटलच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांनी सांगितलं की,या महिला उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, ही अविवाहित आहे. एवढा मोठा ट्यूमर पोटात असणं अशा घटना फार दूर्मिळ आहेत. ३ किलोचं १ बाळ अशी १० बाळ होतील एवढं या ट्यूमरचं वजन होत.