शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 मार्च 2019 (08:52 IST)

डॉक्टर मारहाण प्रकरण भाजपा नगरसेविकेला अटक करा अन्यथा राज्यात काम बंद आंदोलन

पुणे येथील भाजपा नगरसेविका आरती कोंढरे यांच्यावर महिला डॉक्टर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे, तर त्यांच्यावर डॉक्टर प्रोटेक्शन कायद्यानुसार कारवाई न झाल्यास कामबंद ठेवणार असल्याचा इशारा मार्डच्या डॉक्टरानी सरकारला दिला. पुणे येथील  ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना पत्र लिहीत हा इशारा त्यांनी दिला आहे. भाजपा नगरसेविका आरती कोंढरे यांच्या विरोधात ससूनच्या महिला डॉक्टर स्नेहल खंडागळे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, मंगळवारी रात्री स्नेहल या वॉर्ड क्रमांक 43 मध्ये रुग्णावर उपचार करत असताना कोंढरे यांनी तेथे येऊन त्यांना तातडीने त्यांच्याशी संबंधीत रुग्णावर उपचार करण्यास सांगितले होते,  त्यावर स्नेहल यांनी त्या रुग्णाच्या डोक्यात टाके घातले असून सी टी स्कॅनसाठी पाठवायचे आहे असे सांगितले. या उत्तरावर चिडलेल्या नगरसेविकेने तुझी तक्रार वरिष्ठांकडे करते सांगून मोबाईल कॅमेराद्वारे चित्रीकरण करायला सुरुवात केली, त्यावेळी डॉ. स्नेहल यांनी त्यांना थांबायला सांगितले, त्यावेळी कोंढरे यांनी  त्यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुला बघून घेईन अशी धमकी देखील  दिली आहे. दरम्यान कोंढरे यांचा मुलगा पृथ्वीराज सचिन कोंढरे यांच्याकडून झालेल्या अपघातामध्ये संबंधित रुग्ण जखमी झाला होता. राज्यातील डॉक्टरांनी जर आंदोलन केले तर त्याचा मोठा फटका राज्यातील अनेक रुग्णांना बसणार आहे.