मंगळवार, 9 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (17:04 IST)

प्रकाश आंबेडकर यांची मोठी घोषणा भारिप बहुजन महासंघ पक्ष बहुजन वंचित आघाडीत विलीन

akola
अकोला येथे ‘भारिप बहुजन महासंघ’ पक्ष वंचित बहुजन आघाडीत विलीन करण्याची घोषणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरयांनी केली आहे. अकोला येथे निवासस्थानी पत्रकार परिषदेत त्यांनी घोषणा केली आहे.

आंबेडकर म्हणाले की ‘भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा ‘अकोला पॅटर्न’ला यश मिळाले आहे. मात्र ‘भारिप’ या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला फार मर्यादा होत्या, वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असून, या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीत भारिप-बमसं विलीन करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निश्चितच सक्षम पर्याय म्हणून समोर येणार असून, निवडणुकीचे निकाल काहीही लागेतील मात्र आमचा पुढील प्रवास हा वंचित बहुजन आघाडी याच बॅनर खाली होणार आहे. असे त्यांनी सांगितले. देशात सध्या दबावतंत्राचे, नात्यागोत्याचे जोरदार राजकारण सुरू असून जतनेला काय वाटते, त्यांना खुश कसे ठेवता येईल याचा विचार न करता आपल्या नातेवाईकांना कसे खुश ठेवता येईल, याचाच विचार केला जात असल्याचा टीका त्यांनी केली आहे. भाजपा सरकार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने चालत असून संघाची विचारधारा ही देशाला घातक आहे असे आंबेडकर यावेळी म्हणाले आहे. यावेळी प्रदेश प्रवक्ते प्रा.धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोंडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे आदी उपस्थित होते.