मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मार्च 2019 (09:29 IST)

उदयनराजे भोसले यांच्या विरोधात प्रशांत वारकर

सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात महायुती, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहणार आहेत. त्याबरोबरच आता तृतीयपंथीयांचा उमेदवार म्हणून प्रशांत वारकर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
 
 यावेळी वारकर म्हणाले, ‘प्रस्थापित समाजानं आमचं अस्तित्व कायम नाकारलं. हाडामासाची माणसं असूनही केवळ आमच्या नैसर्गिक भावनांचा कौल ऐकून जगणंही समाजाला नको होतं. यातून गेल्या काही दशकांतील आमची लढाई यशस्वी झाली आणि आम्हाला कायद्यानेच स्वतंत्र अस्तित्व बहाल केले. कायद्याने दिलेले हे अस्तित्वही नाकारण्याचे अनुभव आम्हाला आले. त्यामुळे आमच्या हक्कांसाठी निवडणूक रिंगणात उतरण्याचं मी ठरविलं आहे.’  असे सांगितले.