शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (08:06 IST)

उस्मानाबाद येथे आता शिवसेना उमेदवाराच्या व्हायरल क्लिप मुळे गोंधळ

शिवसेना पक्षाचे उस्मानाबादचे अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर हे वादात सापडण्याची शक्यता निर्माण जाहली आहे. या मतदार संघात आगोदर कार्टून वॉरनंतर आता त्यांची कथित वादग्रस्त क्लीपने उस्मानाबादच्या राजकारणात धक्का बसला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या वादग्रस्त क्लिपमध्ये त्यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजीराव सावंत, विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना‘शिवराळ’भाषा वापरल्याचं समोर येते आहे. खासदार गायकवाड यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना 10 टक्के पैसे घेऊन कामे वाटप केल्याचा देखील गंभीर आरोप केला आहे. या व्हायरल क्लिपवर विश्वास ठेवू नका, ती खोटी असून, शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन संपले असून विरोधकांचा हा डाव असल्याचा खुलासा माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी केला असून, निंबाळकर यांनी सदरील क्लिप ही राजकीय फायदा घेण्यासाठी बनवली असल्याचा आरोप केला आहे. मात्र या क्लिपची जिल्ह्यात जोरदार चर्चा असून याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर या वादग्रस्त क्लिपबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे.