सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (16:19 IST)

महाराज नमस्कार, ही पाच रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा - शरद पवार

साधू संत कधी कोणाकडे काही मागत नाही, तर मागणारा हा संत असणारच नाही. सोलापुर मध्ये मला मताचा शिक्का द्या म्हणणारा महाराज मी देव आहे, असे सांगत असल्याचे मी वाचले आहे. त्यामुळे राजकारण हे तर महाराजांचे बिलकुल कामच नाही तर ही भोंदुगिरी समाज व देशाच्या हिताची नाही. त्यामुळे अशा महाराजांना सांगू या, महाराज नमस्कार, ही पाच रुपयाची नोट घ्या आणि मठात जाऊन बसा. राजकारण हे तुमचे काम नाही, अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सोलापूर येथे केली आहे. 
 
सोलापूर लोकसभा काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा झाली होती, व भाजपने नऊ, दहा महाराज निवडून आणले असून महाराज भगवे कपडे घालून संसदेत बसले आहेत. मात्र पाच वर्षात यांनी कधी एकदाही तोंड उघडलं नाही आणि एक प्रश्न देखील विचारला नाही. मी मात्र कोणत्याही महाराजांचा अनादर करीत नाही. पण महाराजांनी मठात जायचे सोडून इकडे कुठं. एका महाराजाला विचारलं कसं चाललंय म्हणून. महाराज म्हणाले परमेश्वर की कृपा है, आज बेहतर है, कल या परसो बेहतर होगा. सबका कल्याण करेंगे, म्हणाले. काय कल्याण, इकडे प्यायला पाणी नाही, तरुणांना नोकऱ्या नाहीत त्याचे काय? दिल्लीचं हे वारं सोलापुरातही आलेले दिसते आहे असे शरद पवार म्हणले आहेत.