मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

5 एप्रिल: या अमावास्येला विहिरीत टाका दूध आणि बघा चांगले परिणाम

अमावास्येला अनेक लोकं घाबरतात आणि कोणतेही चांगले काम या दिवशी करणे टाळतात. अशात प्रश्न हा निर्माण होतो की अमावास्येला असं काय करावं की हा दिवस शुभ दिवस म्हणून व्यतीत झाला पाहिजे. तर उत्तर अगदी सोपं आहे की या दिवशी पूजा-पाठ, आराधना करून वेळ घालवावा. याने नकारात्मकता दूर होते आणि देवाची आपल्या कृपा राहते. तर आज काही सोपे असेच उपाय आम्ही आपल्याला सांगणार आहोत जे अमावास्येला केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील. आर्थिक चणचण दूर होईल. धनासंबंधी समस्या नाहीश्या होतील आणि प्रत्येक कामा यश मिळू लागेल. तर जाणून घ्या उपाय:
 
* अमावास्येला घरात कापूर जाळावा याने नकारात्मकता दूर होते.
* या दिवशी कृष्ण मंदिराच्या डोम पिवळा ध्वज लावायला पाहिजे. याने सर्व अडथळे दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग दिसू लागतो.
* तसेच अमावास्येला संध्याकाळी जवळपासच्या विहिरीत गायीचं सव्वा पाव दूध चमचा सोडावे. याने धनाची आवक वाढेल.
* या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळात एक लोटा कच्च्या दुधात बत्तासे आणि अक्षता मिसळून अर्पित करावे.
* तसेच पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच झाडाच्या सात प्रदक्षिणा घालाव्यात याने पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. आणि पितृ प्रसन्न असल्यास सर्व कार्य सुरळीत पार पडतात.
* अमावास्येला महादेवाला कच्चं दूध, दही आणि मध या पदार्थांनी अभिषेक करावे. तसेच महादेवाला काळे तीळ अर्पित करावे.
* या दिवशी शनी देवाची पूजा करण्याचे देखील महत्त्व आहे. या दिवशी शनी मंदिरात निळे फुलं, काळे तीळ आणि अख्खी काळी उडीद डाळ, तिळाचे तेल, काजळ आणि काला कपडा अर्पित करावा. मंदिरात बसून शनी मंत्राची एक माळ जपावी.
* तसेच एक विशेष उपाय त्या लोकांसाठी ज्यांची जन्म तिथी अमावस्या असेल. अमावस्या या तिथीला जन्म घेणार्‍यांनी प्रत्येक अमावास्येला महादेवाला अभिषेक करावा. याने त्यांची आणि कुटुंबातील आर्थिक स्थिती सुधारेल आणि कष्ट कमी होतील.