मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

दर्श अमावास्येला चंद्र देवाची कृपा मिळवा

हिंदू शास्त्रांप्रमाणे दर्श अमावास्येला चंद्र पूर्ण रात्र गायब असतो. सुख- समृद्धी आणि कुटुंबाच्या उद्धारासाठी प्रार्थना करण्याची ही सर्वात योग्य वेळ आहे असे म्हणतात. या दिवशी पूर्वजांची पूजा करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी पितर खाली येऊन आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतात म्हणून या दिवशी मनोभावे प्रार्थना करणार्‍यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे देखील म्हटले आहे. या अमावास्येला श्राद्ध अमावास्या देखील म्हटलं जातं. पितृ दोषापासून मुक्तीसाठी या दिवशी पितृ तरपण, स्नान-दान पुण्य फलदायी प्रदान करणारे मानले गेले आहे. 
 
तसेच जीवनातील संघर्ष, अडचणी दूर करण्यासाठी या अमावास्येला व्रत ठेवून चंद्र पूजन केल्याने यश प्राप्ती होते. चंद्र देव सर्व इच्छा पूर्ण करतात. या दिवशी चंद्र दर्शन आणि उपास केल्याने आध्यात्मिक संवेदनशीलता प्राप्त करता येते.
 
दर्श अमावास्येला चंद्राची पूजा केल्याने भाग्य उजळत असून समृद्धी प्राप्त होते. चंद्र देवाची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात. चंद्रदेवाची पूजा केल्याने मनाला शीतलता आणि शांती मिळते.
 
तसेच ज्या लोकांच्या जीवनात अधिक संघर्ष आहे त्यांनी तर नक्की चंद्र देवाची पूजा करावी. याने त्यांच्या अडचणी दूर होतात. तसेच मोक्ष प्राप्तीची इच्छा असणार्‍यांनी व्रत करून चंद्र देवाचे दर्शन केल्याने लाभ मिळेल.
 
संध्याकाळी चंद्र देवाची विधिपूर्वक पूजन करावे. गायीच्या तुपाचा दिवा लावावा. कापूर जाळावे. चंद्राला पांढरे फुलं, चंदन, तांदूळ आणि अत्तर अर्पित करावे. खिरीचा नैवेद्य दाखवावा. पंचामृताने चंद्राला अर्घ्य द्यावे आणि पांढर्‍या चंदन माळीने 108 वेळा "ॐ ऐं क्लीं सोमाय नमः" मंत्र जपावं. पूजननंतर नैवेद्य एखाद्या महिलेला भेट करावे.
 
तसेच अमावास्येला प्रेत आत्मा सक्रिय असतात म्हणून चतुर्दशी आणि अमावास्येला कोणतेही वाईट करणे टाळावे. हा दिवस धार्मिक पद्धतीने, पूजा पाठ, आराधना करत घालवावा.