दर्श अमावास्या, 6 उपायांमुळे जीवनात येईल शुभ काळ
बुधवार, 6 मार्च 2019 रोजी दर्श अमावस्या आहे. पौराणिक शास्त्राप्रमाणे महाशिवरात्रीनंतर येणार्या या अमावास्येचा विशेष महत्त्व आहे. कृष्ण पक्षातील या अमावास्येला मोठी अमावस्या, स्नान दान अमावस्या असे देखील म्हटले जाते.
या दिवशी नदी स्नान आणि तीर्थक्षेत्रात स्नान-दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सर्व सुखांची प्राप्तीसाठी काही खास उपाय सांगत आहोत.
पितृ दोष दूर करण्यासाठी अमावास्येला पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. परंतू अमावास्येला काय करावे आणि काय नाही हे स्पष्टपणे माहीत नसतं. म्हणून येथे विशेष अचूक उपाय सांगण्यात येत आहे.
* प्रत्येक अमावास्येला दक्षिणाभिमुख होऊन दिवंगत पितरांसाठी पितृ तरपण करावे. पितृस्तोत्र किंवा पितृसूक्त पाठ करावे.
* प्रत्येक अमावास्येला आपल्या पितरांची आठवण काढत पिंपळाच्या झाडाला गंगाजल, काळे तीळ, साखर, तांदूळ, पाणी आणि फुलं अर्पित करावे. हे अर्पित करताना 'ॐ पितृभ्य: नम:' मंत्राच जपावे. नंतर पितृसूक्त पाठ करणे शुभ फळ प्रदान करतं.
* प्रत्येक संक्रांती, अमावस्या आणि रविवारी सूर्य देवाला तांब्यांच्या लोट्याने अर्घ्य द्यावे. लोट्यात शुद्ध पाणी, लाल चंदन, गंगा जल मिसळून 'ॐ पितृभ्य: नम:' हे बीज मंत्र म्हणत 3 वेळा अर्घ्य द्यावे.
* त्रयोदशीला नीलकंठ स्तोत्राचा पाठ करावा, पंचमी तिथीला सर्पसूक्त पाठ, पौर्णिमेच्या दिवशी श्रीनारायण कवच पाठ केल्यानंतर यथाशक्ती ब्राह्मणांना पूर्वजांची आवडती मिठाई, खाद्य पदार्थ दक्षिणेसह द्यावे. याने पितृ दोष दूर होतो आणि शुभ फळांची प्राप्ती होते.
* या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर कच्चं दूध, दह्याने अभिषेक करून काळे तीळ अर्पित केल्याचे विशेष महत्त्व आहे.
* या दिवशी प्रभू श्रीहरी विष्णू मंदिरात पिवळ्या रंगाचे ध्वज अर्पित करावे. याने सर्व कष्ट दूर होतील आणि जीवनात सर्व शुभ घटित होईल.
शास्त्रांप्रमाणे अमावस्या सुख-सौभाग्य आणि धन-संपत्ती, वैभव इतर गोष्टीसाठी विशेष मानली जाते. या दिवशी वरील सांगितलेले उपाय अमलात आणून आनंदी जीवनाचा लाभ मिळू शकतो.