ह्या गुरुवारी अर्थातच २१ ऑगस्ट रोजी सकाळी ०६.२३ पासुन गुरुपुष्यामृत योग आहे. गुरुपुष्यामृत गुरुवार सकाळी ०६.२३ पासुन ते गुरुवार उ. रात्रौ १२:०८ पर्यंत आहे. (एकुण काळ १७ तास ३१ मिनीटे). या कालावधीत श्री. गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्याची सुवर्ण संधी आहे.
या शुभ संयोगावर ज्या भक्तांना गुरुपुष्यामृत योगावर पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी ह. भ. प. श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथाचे संपुर्ण पोथीचे पारायण करावे. आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक कर ऑनलाइन संपूर्ण पारायण करु शकता.
गुरुपुष्यामृत काळ फक्त दुसरा दिवस सूर्योदय पर्यंत आहे. त्यामुळे भक्त सायंकाळी, रात्री, अहोरात्र पारायण करू शकतात.
नौकरी मूळे किंवा काही अपरिहार्य कारणामुळे ज्या भक्तांना संपुर्ण पोथीचे पारायण करने शक्य नाही ते श्री गजानन विजय ग्रंथ २१ व्या अध्यायाचे वाचन अथवा छोट्या पोथीचे पारायण करू शकतात किंवा ह. भ. प. दासगणू महाराज विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र / श्री गजानन बावन्नी याचे वाचन करु शकतात.
पोथीत वर्णन केलेले आहे की
|| गुरुपुष्य योगावरी | जो याचे पारायण करी | बसून एक्या आसनावरी | राहूनिया शुचिर्भूत | त्याच्या अवघ्या मनकामना | खचित होतील पूर्ण जाणा | कसल्याही असोत यातना | त्या त्याच्या निरसतील ||
पारायणाची पद्धत:
संपूर्ण पारायण (एका दिवसात):
पहाटे लवकर उठून, स्नान करून, स्वच्छ वस्त्र नेसून तयार व्हा.
गजानन महाराजांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसा.
पूजेची तयारी करा, दिवा लावा आणि उदबत्ती लावा.
नंतर, "श्री गजानन विजय" ग्रंथाचे पठण सुरु करा.
एकाग्रचित्ताने आणि श्रद्धेने संपूर्ण ग्रंथ (२१ अध्याय) वाचा.
वाचन करताना, कोणत्याही प्रकारचा गजर किंवा इतर गोष्टी टाळा.
गरजेनुसार विश्रांती घ्या, पण शक्यतो अखंड वाचन करण्याचा प्रयत्न करा.
पारायण झाल्यावर, पुन्हा एकदा आरती करा आणि महाराजांना नमस्कार करा.
पारायणाचे महत्तव
गजानन विजय ग्रंथाचे पारायण केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते, असे मानले जाते.
महाराजांच्या कृपेने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात.
पारायण केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मकता लाभते.